शिरढोण परिसरात नुकत्याच आलेल्या महापुरामुळे शेतीस मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूरग्रस्त भागातील शेतीची नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली.कृषी विभाग,महसूल प्रशासन आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.या पंचनाम्यात ऊस,भुईमूग तसेच भाजीपाला पिकांचे प्रत्यक्ष शेतात जाऊन बारकाईने पाहणी करण्यात आली.