राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथे पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेल्या एका महिलेचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मनीषा महेश बरगे (वय ४०) असे मृत महिलेचे नाव असून, याबाबतची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात आज शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार,मनीषा बरगे या सकाळच्या सुमारास शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या.