साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा बहुउद्देशीय संस्था मोर्शी यांचे वतीने आज दिनांक 3 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता तहसीलदार मोर्शी यांना निवेदन देण्यात आले आहे. दलित वस्ती निधी गेल्या कित्येक वर्षापासून मातंगपुरा आंबेडकर चौक येथे खर्च केला नसल्याचा नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासनावर आरोप करून, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सौंदर्यकरण व स्मारक बांधणी करिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे