पाचोरा भडगाव मतदार संघात सोशल मीडिया वर भारतीय जनता पार्टीचे लोकसभा निवडणूक अध्यक्ष तथा माजी तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे व त्यांचे काही समर्थक भारतीय जनता पार्टी सोडून इतर पक्षात प्रवेश करीत आहे. अशी अफवा फिरवणारी पोस्ट व्हायरल होत असल्याची माहिती नेते अमोल शिंदे यांकडून आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता देण्यात आली असून, या आधी देखील माझ्या बाबतीत निवडणूकीच्या काळांत अशाच पद्धतीने चुकीच्या पोस्ट व अफवा काहींकडून हेतू पुरस्कर बदनामीच्या हेतूने व्हायरल केल्या गेल्या.