शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळदे गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत वानराचा पाच दिवसाचा दुखवटा पासून 27 ऑगस्ट रोजी हनुमान चालीसा पठणाने हनुमान मंदिर परिसरात गंधमुक्ती,दशक्रिया आणि उत्तरकार्य आदी विधी पार पाडून श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला.सदर हल्ल्याची घटना 23 ऑगस्ट रोजी गावाजवळ घडली होती त्यानंतर गावकऱ्यांनी शोककळा व्यक्त करीत पाच दिवसांचा दुखवटा पाडला होता.