आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ एक हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. शुक्रवारी मध्यरात्री पंचवटी,भद्रकाली,आडगाव,अवधूत वाडी व इतर भागात नाकाबंदी करून सराईत गुन्हेगारांच्या घरांच्या झडत्या घेतल्या.या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. याविषयी उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे.