भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास कारधा उडान पुलावर ट्रक व मोटरसायकलचा अपघात झाल्याची घटना आज दि. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. दरम्यान उघडकीस आली आहे. यात नितीन दिलीप कटरे वय 25 ता. गोरेगाव व रजनीश गणपत धार्मिक वय 27 रा. शिवनी (मोगरा) हे दोघेही जखमी झाले. ते मोटरसायकल क्र. MH 36 AP 5563 ने नागपूरकडून लाखनीला जात असता नागपूर कडून रायपूर मार्गे जात असलेला आयशर ट्रक क्रमांक HR 55 1397 ने त्यांना कट मारले. त्यात नितीन व रजनीश जखमी झाले.