धामणगाव रेल्वे तालुक्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे.शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज १३ सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजुन २० मिनिटांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार प्रताप अडसड यांनी कावली या गावांतील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शासनस्तरावर तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन...