मोताळा तालुक्यातील राजुर घाटात खडकी फाट्याजवळ एस.टी. महामंडळाच्या भरधाव बसखाली १३ मेंढ्या चिरडून ठार झाल्या. तसेच ५ मेंढ्या गंभीर जखमी आहेत. यात वारुळी येथील मेंढपाळ संजय दगडू बिचकुले यांचे मोठे नुकसान झाले आहे. एस.टी. प्रशासनाने संजय बिचकुले यांना योग्य नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा असे मत उबाठा शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता व्यक्त केले.