तालुक्यातील पुनर्वसीत केलपाणी गावातील एक जण अस्वलाचा हल्यात गंभिर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सोमवारी दुपारी प्राप्त झालीय अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांच्या जवळ असणाऱ्या पुनर्वसित केलपाणी गावातील एका व्यक्तीवर अस्वलीने हल्ला केल्याच्या घटनेत हा व्यक्ती गंभिर जखमी झाला असल्याने त्यास प्रथमोपचारासाठी अकोट ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते मात्र तो मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे.