नांदेड - बिदर राष्ट्रीय महामार्गवरील फुलवळ टोल नाक्याजवळ स्वस्त धान्य दुकानाचा माल वाहतूक करणारा ट्रक क्र. PB-04-AF-8448 हे वाहन विव्हायडरला धडकल्याने अपघात होऊन त्यात 650 तांदुळाची पोते हे पडली होती, ह्या पोत्यांवर महाराष्ट्र शासन असे चिन्ह असल्याने हा माल आता संशयाच्या भोवऱ्यात आला आहे, सदर ट्रकचा व्हीडिओसहित कार्यकर्त्यांचे संभाषण देखील आजरोजी दुपारी 4 पर्यंत व्हायरल होताना दिसत असून हे माल गोरगरिबांचे हक्क मारून चोरून विकण्याचा आरोप आता होत आहे.