75 वर्ष स्वातंत्र्यानंतरही गाव रस्त्याविना आहे. सरांडा (बुज) ग्रामस्थांचा संताप उसळला आहे.धानोरा तालुक्यातील मुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सरांडा (बुज) हे गाव आजही रस्त्याविना अंधारात आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, पण गावाला जोडणारा पक्का रस्ता आजवर झाला नाही, यावरून नाराज ग्रामस्थांनी आझाद समाज पक्षाकडे गऱ्हाणे मांडले आहे.