पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील तुम्ही मुलाला दारू पिण्यासाठी पैसे घेऊन या, असे का म्हणतात, असे विचारल्याने पतीने पत्नीस पुकारेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पतिविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती तालुका पोलिसांनी आज, शुक्रवार, दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिली आहे.