गांधीनगर पोलीस ठाणे येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेला आरोपी संदेश तायडे याला सदर बाजार चौक येथून अटक करून पुढील तपास कामी त्याला गांधीनगर पोलीस ठाण्यात हजर केले असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.