भंडारा तालुक्यातील खमारी शिवारात वैनगंगा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती कारधा पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची चौकशी केली असता सदरचे मृतदेह गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील मांडवी येथील राजेंद्र देविदास मारबते या मासेमाराचे असल्याचे स्पष्ट झाले. राजेंद्र मारबते वय 40 वर्षे हा दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता दरम्यान वैनगंगा नदीमध्ये मासे पकडण्याकरिता गेला होता. मात्र तो घरी परत न आल्याने त्याच्या भाऊ सुरेंद्र...