भंडारा शहरातील स्प्रिंग डेल स्कूल येथे विश्व हिंदु परिषद धर्मप्रसार विभागाची बैठक दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान पार पडली. या बैठकीत धर्म, संस्कृती आणि समाजहितासाठी अनेक विधायक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला विश्व हिंदु परिषद केन्द्रीय मंत्री, धर्मप्रसार विभाग सुधांशु पटनायक यांचे मार्गदर्शन झाले. अशा बैठका समाजाला दिशा देणाऱ्या आणि ऐक्य बळकट करणाऱ्या ठरतात. असे मत त्या बैठकीला उपस्थित असलेले माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.