लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून त्याचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसला आहे. लातूर ते कवठा-केज या मार्गावरील बोपला पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तसेच जिल्हा प्रशासनाने हा मार्ग तत्काळ बंद केला आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.