आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगांव येथे शाशकीय धान खरेदी हंगाम सन २०२३/२४ व २०२४/२५ या वर्षात जवळपास तब्बल ४ कोटीचा घबाड करण्यात आल्याचा आरोपावरून कूरखेडा पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल करण्यात आलेला व मागील चार महिण्यापासून पोलीसाना गुंगारा देत फरार असलेला प्रकरणाचा मूख्य सूत्रधार संस्थेचा व्यवस्थापक महेन्द्र मेश्राम याला गोपनीय माहीती वरून आज दि.२६ आगस्ट मंगळवार रोजी अटक करण्यात आली दूपारी ३ वाजता न्यायालय हजर केल्यावर त्याला ६ दिवसाची पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे.