महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या राज्योत्सव अर्थात गणेशोत्सवाची नाशिक शहरात विसर्जन मिरवणूक शनिवार दिनांक 6 सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा करण्यात आला.या पाहणीदरम्यान वाकडीबाराव,दूध बाजार,मेन रोड,धुमाळ पॉईंट,एम.जी. रोड,रविवार पेठ,रविवार कारंजा,अहिल्याबाई होळकर पूल,पंचवटी कारंजा ते रामकुंड परिसर,सरदार चौक,गोदाघाट या महत्त्वाच्या मार्गांचा आढावा घेतला.