आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील आडगाव भों.येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे,याविषयी सविस्तर माहिती अशी की आडगाव भों.येथील शेतकरी अतुल भगवान भोंबे या शेतकऱ्याचा बैल हा बैलपोळा सण साजरी करून आल्यानंतर शेतात जाताना विहिरीत पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, यावेळी सदर बैल विहिरीत पडला असता नागरिकांनी मिळाला वाचवण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र वाचू शकला नाही,यात शेतकऱ्याचे 70ते 80 नुकसान झाले.