सेनगांव पोलीस ठाण्यात आरोपीवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगांव पोलीस ठाणे अंतर्गत एका ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलगी दुपारच्या सुमारास घरात असताना आरोपीने घरात प्रवेश करून मुलीचा विनयभंग केला तसेच आरडाओरड केल्यास जीवे वरून टाकू अशी धमकी दिली त्यानंतर मुलीच मारहाण करण्यास सुरुवात केली.