राजुरा येथे आमदार देवराव भोंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दि 3 सप्टेंबर ला 12 वाजता आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. हे कार्यालय गरीब, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेच्या समस्या सोडविण्याचे केंद्र ठरेल. जनतेच्या कल्याणासाठी हे केंद्र आदर्श ठरून सेवाभावाचे नवे शिखर गाठेल, असा ठाम विश्वास आहे. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी नांदो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले.