यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस स्टेशन वडकी येथे आज दिनांक सात सप्टेंबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनच्याप्रांगणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वडकी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अंमलदार व होमगार्ड उपस्थित होते.