ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी असते तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत त्यामुळे घोडबंदर रोडवरील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. सर्व नागरिक महानगरपालिकेला टॅक्स भरतात मात्र त्या मोबदल्यात सुविधा मिळत नाहीत त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी व स्थानिक रहिवाशांनी खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात आवाज उठवावा यासाठी गाड्यांवर बॅनर चिटकवून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवला तर प्रशासन दाखल घेईल या हेतूने ही मोहीम राबवली आह