धुळे शहरातील महात्मा गांधी चौकात 10 सप्टेंबर बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान इंडिया आघाडी वतीने पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने काळ्या फिती बांधून केंद्र सरकार, राज्य सरकाराचा निषेध करत जोरदारपणे घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटना विरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व्हावी व हुकूमशाही यंत्रणा बळकट व्हावी हाच कुटील हेतू या विधायकाच्या माध्यमातून स