शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने मंद्रूप बाजारपेठेत शुक्रवारी सायं 5 वाजता आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला “संघर्षाचा पोळा, कर्जमुक्तीचा पोळा” असे स्वरूप देण्यात आले. आंदोलनादरम्यान “७/१२ कोरा - कोरा, शेतकरी कर्जमाफी हवीच”, “जात धर्म पक्ष सोडा, शेतकऱ्याशी नात जोडा” अशा घोषणा दिल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, शेतमालाला हमीभाव मिळावा या मागण्यांवर ठाम भूमिका घेण्यात आली. प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी माहिती दिली.