ठाणे महानगरपालिकेच्या प्रांगणात आज ३१ ऑगस्ट हा 'स्थानिक स्वराज्य दिन' साजरा करण्यात आला. या निमित्ताने, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आणि अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा मंडळाचे जवान तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.