आष्टगाव बस स्टॉप वर असलेला राजेंद्र जनार्दन लांडे यांचा पानठेला फोडून, पान मटेरियल, दुचाकी चे ट्यूब इतर साहित्य व नगदी रक्कम असा एकूण 13000 रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज दिनांक 22 ऑगस्ट ला सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. याबाबतीत राजेंद्र जनार्दन लांडे यांनी मोर्शी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून मोर्शी पोलिसांनी दाखल तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे