वनराज आंदेकर हत्येतील आरोपी सूरज ठोंबरेची पोलिसांकडून धिंड माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी सूरज ठोंबरे याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची शहरभर धिंड काढण्यात आली. ठोंबरे हा दोन दिवस वडिलांच्या उपचारासाठी जामिनावर बाहेर आला होता. या काळात त्याने पुण्यातील झेड ब्रिज परिसरात तब्बल पाचशे तरुणांना गोळा करून कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्याच्या सोबत तडीपार गुन्हेगार व काही टोळीप्रमुख हजर असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. या पार्श्वभूमीवर