मागिलकाही दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. गणेशोत्सवाच्या अगोदर खड्डे भरण्याचा इशारा अनेक पक्षांनी देत आंदोलन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आणि बाप्पांचे खड्डे मुक्त रस्त्यावरून आगमन व्हावे यासाठी कल्याण वाहतूक विभागाकडून खड्डे भरण्याचे काम करण्यात आले. मात्र दुपारी रहदारीच्या वेळी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतल्यामुळे दुर्गाडी चौक येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ती वाहतूक कोडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.