समुद्रपुर: तालुक्यातील गिरड,कोरा परीसरात सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारी झालेल्या पावसामुळे नदिनाले तुटुब पाहत असुन या नदी नाल्यांचे पाणी लालनाला प्रकल्पात वाहुन गेल्याने लालनाला प्रकल्पात तुटुब भरला असुन मंगळवारी ४ वाजता लालनाला प्रकल्पाचे ३ दरवाजे गेट २० सेंटीमीटर तर २ दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले असून ६७.८८ टक्के कुसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे परीसरातील नागरीकांना खबरदारी घेण्याचे आवाहन तहसीलदार कपिल हाटकर यांनी केले आहे.