राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतूदीस प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “राज्य आर्थिक संकटात असताना,हा महामार्ग म्हणजे जनतेवर ५० हजार कोटींचा दरोडा आहे,असा आरोप राजू शेट्टी यांनी आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता केला आहे.