पनवेल येथे ट्रिपल सीट बसून विना हेल्मेट स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी क** कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल केला असून त्यांना सोशल मीडियावर माफी मागायला लावली. तसेच आपल्या सोबत इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले.