परभणी शहर महानगरपालिका प्रभाग समिती क कार्यालयाच्या पथकाच्या वतीने 26 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास प्रतिबंधात्मक प्लास्टीकचा वापर करणा-या दोन व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये प्रत्येकी रु. 5000/- या प्रमाणे रु. 10,000/- दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम प्रभाग समिती क चे मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांच्या नियंत्रणात स्वच्छता निरीक्षक अब्दुल शादाब, प्रल्हाद देशमाने, सौरभ जोगदंड व शशी लहाने मुकादम ईतर स्वच्छता कर्मचारी यांनी राबविली.