धर्माबाद शहरातील गांधीनगर येथील मटण व मच्छी मार्केट बाजार हे नुकतेच स्थलांतरित करण्यात आले असून ही दुकाने रजिस्टर ऑफिस कार्यालया समोरील भागामध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत, या ठिकाणी दुकाने टाकण्यासाठी नगरपालिकेने जागा निर्धारित करून दिली असून सदरील नव्या जागेमध्ये लाईट व पाणी तसेच रस्त्याची सोय करून देण्याची मागणी चिकन मटण व मासोळी विक्रेत्या दुकानदारांनी आजरोजी दुपारी तीनच्या सुमारास केले आहेत.