भंडारा येथील वैनगंगा नदी नदीवर सुरू असलेल्या वाटरस्पोर्ट्स अकॅडेमी भंडारा करिता सराव करण्यात सहकार्य व्हावे. म्हणून भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नवीन बोट घेऊन दिली. दरम्यान दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते या नवीन बोट चे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी अकॅडमी तील सर्व प्रशिक्षक व खेळाडू या ठिकाणी उपस्थित होते.