2 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 10:45 वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन दवनीवाडा परिसरात ग्राम रायपुर ते सालईटोलाकडे जाणाऱ्या रोडवर मृतक नामे हसनलाल भंडारी पाचे वय 37 वर्ष रा.रायपूर यास कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यावर कोणत्यातरी धारदार हत्याराने मारून जीवानीशी ठार केल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया व पोलीस स्टेशन दवनीवाडा हे गुन्ह्याचा तपास करत असताना अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात आला. दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.