चिखलदरा तालुक्यातील घाणा कन्हेरी शेतशिवारात काल दुपारी २ वाजताच्या सुमारास झालेल्या अस्वलीच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला.आजू हिराजी जामुनकर (५५) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. आजू जामुनकर हे नेहमीप्रमाणे गुरे व बैल चारण्यासाठी शेतशिवारात गेले होते. यावेळी झुडपांमध्ये अस्वलीच्या पिल्लांना घेऊन फिरणारी मादी अस्वल अचानक बाहेर आली आणि तिने जामुनकर यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा आल्या असून आरडाओरड केल्याने आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली.