आर्णी तालुक्यातील कवठा बाजार आणि राणी धानोरा परिसरातील पूरग्रस्त भागातील शेती पिकांच्या स्थितीची काँग्रेस पक्षाच्या उच्चस्तरीय समितीने आज दिनांक 30 सप्टेंबरला पाहणी केली. पूर व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारकडून मदतीचा ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे, अशी तीव्र टीका समितीने केली. या पाहणी समितीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर आदींचा समावेश होता. सम