आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी क्रांती चौक पोलिसांनी माहिती दिली की,, 9 सप्टेंबरला रात्री अकरा वाजता महिला फिर्यादी सोनाली राहुल कोठारी राहणार उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, नऊ सप्टेंबरला रात्री आठ वाजता खोकडपुरा परिसरात दुचाकी वर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी महिला फिर्यादीच्या गळ्यातील एक लाख वीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने चोरी करून नेले आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक चौधरी हे पुढील तपास करीत आहे.