चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींसाठीची मासिक मानधन योजना अंतर्गत नोंदणीकृत आहेत. मात्र, गेल्या ७-८ महिन्यांपासून या योजनेचे मासिक मानधन अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाशी पाठपुरावा करून गोरगरिब लाभार्थ्यांचे थकीत मानधन तातडीने मंजूर करून द्यावे अशी मागणी तहसिलदार पुजा माटोडे यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली