बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल रोडवर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेची दुचाकी स्वार चोरांनी सोनसाखळी लंपास केली. वंदना भागवत चोपडे ही महिला एका ठिकाणाहून जेवण केल्यानंतर घराच्या दिशेने निघाल्या होत्या. दरम्यान दुचाकी स्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस गुन्हा दाखल केला आहे.