मालेगाव तालुका पोलिसांनी मारली झोडगे येथे जुगार अड्ड्यावर धाड Anc: मालेगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, काल दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एकलव्य नगर झोडगे येथे सुरू असलेल्या रम्मी जुगार अड्ड्यावर धडक छापा टाकण्यात आला. या कारवाईत तब्बल सात जुगारी रंगेहात पकडले गेले असून, रोख रक्कम, मोबाईल, दुचाक्या आणि पत्ते असा १ लाख ८९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.