जालना विभागातील 125 बसेस कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबईत पाठवण्यात आल्या... जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आठवडाभर केवळ 167 बस उपलब्ध... आज दिनांक 26 मंगळवार रोजी सकाळी 9:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना विभागाकडे असलेल्या 292 एसटी बसपैकी तब्बल 125 बस कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत. जवळपास निम्म्या बस कमी झाल्याने जिल्ह्यातील चारही आगारांचे नियोजन विस्कळीत झाले असून प्रवासी सेवेत अडथळे निर्माण झाले आहेत. लांब व मध्यम पल्ल्याच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांन