पाचगाव ते गिरगाव जाणाऱ्या रोडवर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या फिर्यादी सुनिता माने व त्यांची मैत्रीण मंगल पाटील यांच्या अंगावरील एक लाख दोन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी इसमानी चोरून नेले प्रकरणी फिर्यादी यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.