धुळे शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत चित्तोड रोडवरील सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या नंदा जाधव (वय ४९) यांचे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी खरेदीसाठी जात असताना गर्दीचा फायदा घेऊन ही चोरी झाली. २५ ऑगस्ट रोजी त्यांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.