भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्य मार्गावरील करडी जाणाऱ्या रोडवर करचखेडा बस स्टॉप समोर दि. 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. दरम्यान रमेश बुधाजी शेंडे वय 37 रा. करचखेडा हे रोड क्रॉस करत असताना बस स्टॉप जवळ भंडाऱ्या कडून करडी ला जात असलेली मो. सा. क्र MH 36 T 7437 ने धडक दिली. त्यात मोटर सायकल चालक अरविंद आनंदराव मते वय 27 व कृष्णा आनंदराव मते वय 29 रा. पालोरा हे रस्त्यावर पडून तिघे ही जखमी झाले.