मंगळवार दि.५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी पारस रेल्वे स्थानक परिसरात पारस येथील ३० वर्षीय संघपाल खंडारे नावाच्या तरुणाने रेल्वेसमोर येवून आत्महत्या केली होती. या प्रकरणी अकोला जीआरपी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा वडिलांच्या फिर्यादी वरून मृताची पत्नी,सासू,मेहुणी आणि मेहुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी त्यांना अटक केली. आणि बुधवार दि.६ ऑगस्ट रोजी पत्नीसह तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांचा पीसीआर देण्यात आला असून पुढील तपास जीआरपी पोलीस करीत आहेत