सलग पावसामुळे डोणगाव येथील पुलावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू असून, त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांमध्ये तेलगाव, कंदलगाव, विंचूर, गुंजेगाव आणि अकोले (मंद्रूप) यांचा समावेश आहे. पूलावरून सतत पाणी वाहत असल्याने नागरिकांना गैरसोय भासू लागली असून, शेतकरी तसेच सामान्य नागरिकांचे रोजचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली असून, जलस्तर नियंत्रित करण्यासाठी तातडीचे उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.