शहरात ९ सप्टेंबर रोजी जलूस कमेटी अकोटच्या मार्गदर्शनाखाली ईद मिलादुन्नबीचा भव्य जलूस काढण्यात आला. हा जलूस शौकत अली चौक येथून सुरू होऊन शहरातील विविध मार्गाने फिरत परत शौकत अली चौक येथे सरपंरस्त आमिर रजा यांच्या परवानगीने समाप्त झाला. सदर जलूस पूर्णपणे शांतता,सौहार्द व बंधुत्वाच्या वातावरणात पार पडला. यात हजारो नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.जलूस कमेटीच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, एसडीपीओ निखिल पाटील तसेच अकोट शहर पोलिस निरीक्षक अमोल माळवे यांचा सत्कार करण्यात आला